बच्चा है… दिल है साफ, नफरत से…, रोहित पवार यांचा अजित पवार यांना टोला काय?

| Updated on: Jan 07, 2024 | 1:37 PM

अजित पवार यांनी रोहित पवार यांना थेट बच्चा आहे असे म्हटलंय. तर बच्चाबद्दल जास्त बोलायचं नसतं. त्याच्या प्रश्नाला उत्तरं द्यावीत एवढा मोठा झाला नाही. माझे कार्यकर्ते आणि प्रवक्ते त्याला उत्तर देतील, असं प्रत्युत्तर अजित पवार यांनी दिलं होतं. तर यानंतर पुन्हा रोहित पवार यांच्याकडून ट्वीट करत प्रत्युत्तर देण्यात आलं.

मुंबई, ७ जानेवारी २०२४ : शिंदे गटाला १३ जागा दिल्यात त्यातील ८ खासदार म्हणतात शिंदे गटातून लढायचं नाही. तर भाजपच्या कमळावर निवडणूक लढवायची आहे. तर अजित पवार मित्रमंडळाचे काही लोकं अशाच प्रकारे बोलत आहे, असे वक्तव्य करत असताना रोहित पवार यांच्याकडून अजित पवार मित्रमंडळ असा उल्लेखही करण्यात आला. पवार यांच्या वक्तव्यासंदर्भात पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवार यांनी विचारणा केली असता त्यांनी रोहित पवार यांना थेट बच्चा आहे असे म्हटलंय. तर बच्चाबद्दल जास्त बोलायचं नसतं. त्याच्या प्रश्नाला उत्तरं द्यावीत एवढा मोठा झाला नाही. माझे कार्यकर्ते आणि प्रवक्ते त्याला उत्तर देतील, असं प्रत्युत्तर अजित पवार यांनी दिलं होतं. तर यानंतर पुन्हा रोहित पवार यांच्याकडून ट्वीट करत प्रत्युत्तर देण्यात आलं. रोहित पवार यांनी ‘दो कलियाँ’ या हिंदी चित्रपटातील ‘बच्चे, मन के सच्चे’ या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आणि बच्चा है पर मन का सच्चा है! दिल है साफ, नफरत से है दूर…असं कॅप्शनही दिले.

Published on: Jan 07, 2024 01:36 PM
अजित पवार भाजपच्या कमळावर लढणार? ‘त्या’ वक्तव्यावर अजितदादांकडून रोहित पवार यांचा बच्चा उल्लेख, म्हणाले…
रामभक्तांसाठी आनंदाची बातमी, अयोध्येतील राम मंदिरात आता रामायण पाहता येणार, पण कसं?