शरद पवार गटात अलबेल नाही? एका गटाचं म्हणणं दुसऱ्या गटाला पटत नाही… सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?

| Updated on: Jan 10, 2025 | 5:16 PM

मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या एका बैठकीत पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आपापली मतं मांडली, अशी माहिती देखील समोर येत आहे.

सत्तेत सहभागी होण्यावरून शरद पवार गटात दोन मतप्रवाह असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. थेट सत्तेत सहभागी होण्यासाठी एक गट आग्रही आहे तर अजित पवार यांच्या गटात प्रवेश करून सत्तेत सहभागी होण्यासाठी दूसरा गट आग्रही असल्याची सूत्रांकडून माहिती मिळतेय. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या एका बैठकीत पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आपापली मतं मांडली, अशी माहिती देखील समोर येत आहे. यावेळी सत्तेत सहभागी होण्यासंदर्भातील मुद्दा अनेकांकडून चर्चेत आणला आला. विशेष म्हणजे सत्तेत सहभागी होण्याबाबतही दोन मतप्रवाह असल्याची बाब समोर आली आहे. या बैठकीला पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पक्षाच्या कामांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे राजीनामा देणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर आता सत्तेत सहभागी होण्यासाठी शरद पवार गटातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते आग्रही आहेत पण सत्तेत कसं सहभागी व्हायचं यावरून पक्षात दोन मतप्रवाह असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Published on: Jan 10, 2025 05:16 PM
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, चंद्रशेखर बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले, ‘चांगलं काम करतो म्हणून…’
‘अमोल कोल्हेंच्या वक्तव्याची कीव येते, त्यांनीही…’; ‘मविआ’त वादाची ठिणगी अन् मित्रपक्षांकडून टीकास्त्र