Sharad Pawar NCP : पिपाणी अन् तुतारीचं कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा, ट्रम्पेटचा बसला फटका

| Updated on: Nov 25, 2024 | 5:04 PM

महाविकास आघाडीत ठाकरे गट सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चिन्हाच्या घोळाचा या निवडणुकीतही शरद पवार गटाला मोठा फटका बसला आहे. शरद पवार गटाचे उमेदवार नऊ ठिकाणी पडल्याचं दिसून आलं आहे.

गेल्या २० नोव्हेंबर रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा २३ नोव्हेंबरला लागला. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा विजय मिळाला तर महाविकास आघाडीला फटका बसला. राज्यात महायुतीचंच पुन्हा सरकार आलं आहे. राज्यात महायुतीला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. तर महाविकास आघाडीला सर्वात कमी जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेसला 16, उद्धव ठाकरे गटाला 20, शरद पवार गटाला 10 जागा मिळाल्या. त्यामुळे महाविकास आघाडीत ठाकरे गट सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. यानिवडणुकीत लोकसभेप्रमाणे विधानसभेला चिन्हाच्या घोळामुळे शरद पवार गटाला मोठा फटका बसला आहे. यंदाही मतदारांचं तुतारी आणि ट्रेम्पेट या चिन्हांमध्ये मतदारांचं कन्फ्यूजन झालं. त्यामुळे जिंतूर, घनसावंगी, शहापूर, बेलापूर, अणुशक्तीनगर, आंबेगाव पारनेर, केज, परांडा या नऊ मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार पडले. या उमेदवारांचा जेवढ्या मतांनी पराभव झाला, त्यापेक्षा जास्त मते ही पिपाणीला मिळाल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Nov 25, 2024 05:03 PM
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम… उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी तर भास्कर जाधव आणि सुनील प्रभू…
Rohit Pawar : ’30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..’, रोहित पवारांचा पलटवार