Sharad Pawar NCP : शरद पवारांचे ‘हे’ दोन नेते अजितदादांच्या भेटीला, राज्याच्या राजकारणात भूकंप होणार?
आज शरद पवार गटाचे दोन नेते अजित पवार यांच्या भेटीला गेल्याचे पाहायला मिळाले. शरद पवार गटाच्या या दोन नेत्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर.आर.पाटील यांचे सुपूत्र रोहित पाटील आणि अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचल्याचे पाहायला मिळाले.
गेल्या दोन दिवसांपूर्वी साताऱ्यातील शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे हे अजित पवारांच्या भेटीला गेले होते. ही सदिच्छा भेट असल्याच शशिकांत शिंदे यांनी सांगितलं खरं पण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी शशिकांत शिंदेंसारखे नेते दादांना असेच भेटणार नाहीत असं म्हटलं आणि चर्चांना उधाण आलं होतं. त्यातच आज शरद पवार गटाचे दोन नेते अजित पवार यांच्या भेटीला गेल्याचे पाहायला मिळाले. शरद पवार गटाच्या या दोन नेत्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर.आर.पाटील यांचे सुपूत्र रोहित पाटील आणि अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचल्याचे पाहायला मिळाले. रोहित पाटील तासगाव-कवठेमहाकाळमधून विधानसभेची निवडणूक जिंकून पहिल्यांदाच आमदार बनले असून रोहित पाटील यांनी नागपूरमध्ये अजित पवार यांची भेट घेतली. तर रोहित पाटील यांच्यानंतर सलील देशमुख अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले. विधानसभा निवडणुकीत काटोलमध्ये सलील देशमुख यांचा पराभव झाला. अनिल देशमुख हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. त्यांचा मुलगा सलील देशमुखने अजित पवारांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. मात्र मतदारसंघातील कामांसाठी अजित पवारांची भेट घेतली असल्याचे रोहित पाटील यांनी सांगितले.