‘चहा-पोहे तयार होते, आपटे खायला येणार होता अन्…’, शरद पवार गटाच्या नेत्याचा हल्लाबोल

| Updated on: Sep 05, 2024 | 5:28 PM

शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि चेतन पाटील या दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोन्ही आरोपींना 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यानंतर शरद पवार गटाच्या आमदाराला यावर सवाल केले असता त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

Follow us on

जयदीप आपटे घराच्या बाहेर बायकोला भेटायला येणार, पोहे पण बनवलेले होते, चहा पण बनवलेला होता. सगळं झालं होतं, मग अचानक पोलिसांना कळलं दूध गरम झालं आहे. मग पोलीस पोहचले आणि मग अटक करण्यात आली, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांवर निशाणा साधला आहे. दरम्यान, जयदीप आपटेला पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल या प्रकरणात कुणालाही सुटका नाही. कायद्यासमोर सगळे सारखे असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले होते. यावर आव्हाडांना सवाल केला असता ते म्हणाले, आपटेचा अनुभव काय? त्याची डिग्री काय? त्याला पुतळा कोणी बनवायला दिला? काय चौकशी करणार? पुतळा निष्क्रिय कारभारामुळे पडला आता कोणाची चौकशी करणार बोलणाऱ्यांची? असं सवाल करत सरकारलाच त्यांनी घेरलं. पुढे जितेंद्र आव्हाड असेही म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काय आम्ही पाडला का? या घटनेने महाराष्ट्राची अख्या देशभरात मान खाली गेली त्याच्याबद्दल बोला, राजकारण करतात मग येवढे वर्ष तुम्ही काय करतात? असा सवाल करत आव्हाडांनी सरकारला फटकारलं आहे.