CM Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ नेमकी कोणाची? मुख्यमंत्री शिंदेंची की अजितदादांची?
सरकारच्या जीआरमध्ये लाडकी बहीण योजनेचं नाव आहे. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना...मात्र अजित पवार यांच्या मंचावर किंवा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर मुख्यमंत्री हा शब्दच गायब केल्याचे पाहायला मिळतंय. यावरूनच विरोधकांनी अजित पवारांवर निशाणा साधत त्यांना चांगलंच घेरलंय
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून सरकारमध्ये श्रेयवाद रंगतोय असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. दरम्यान, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे नगरमध्ये कार्यकर्ता मेळावा सुरू आहे. या मेळाव्यातील बॅनरवरूनच हा वाद सुरू झाला आहे. नगर जिल्ह्यातील अजित पवार गटाने आयोजित केलेल्या महिला मेळाव्यातील पोस्टर या वादाचे कारण ठरताय. सरकारच्या जीआरमध्ये लाडकी बहीण योजनेचं नाव आहे. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना…मात्र अजित पवार यांच्या मंचावर किंवा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर मुख्यमंत्री हा शब्दच गायब केल्याचे पाहायला मिळतंय. यावरूनच विरोधकांनी अजित पवारांवर निशाणा साधत त्यांना चांगलंच घेरलंय. शरद पवार गट यांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित दादांच्या बॅनरवरून मुख्यमंत्री शब्द नसल्याने अजित पवारांवर निशाणा साधला. सरकारची योजना काय मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना…पण यांनी त्याला माझी लाडकी बहीण योजना केलं. मी करेन तेच खरं ही अजित पवारांची जुनी सवय आहे, असं म्हणत आव्हाडांनी खोचक टोलाही लगावला.