Supriya Sule Video : ‘…तो पुरूष नाहीच’, सुप्रिया सुळेंची धनंजय मुंडेंवर जहरी टीका अन् केला खळबळजनक दावा
सुप्रिया सुळेंनी धनंजय मुंडेंवर जहरी शब्दात टीका केली आहे. बायकोच्या गाडीत बंदूक ठेवणारा पुरूष नाही. त्या घटनेपासूनच आपली लढाई सुरू झाली असं सुळे म्हणाल्या आहेत. तसंच सहा महिन्यात आणखी एक मंत्र्यांचा राजीनामा होणार असा दावाही सुळेंनी केला आहे.
बायकोच्या गाडीत बंदूक ठेवणारा पुरूष नाहीच असा थेट हल्लाबोल सुप्रिया सुळेंनी धनंजय मुंडेंवर केला. त्यांच्यासोबत काम करणार नाही ही भूमिका तेव्हापासूनच होती असं सुप्रिया सुळेंनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात म्हटलं. ‘जो पुरूष स्वतःची जी बायको असेल, जी आपल्या मुलांची आई आहे, तिच्या गाडीत बंदूक ठेऊ शकतो अशा पुरूषाबरोबर एक तर पुरूष नाहीच आणि त्याच्याबरोबर मी काम करणार नाही आणि तेव्हापासून लढाई सुरू झाली. मी आज पहिल्यांदा ही गोष्ट बोलतेय आणि मी माईकवर पण बोलली मी नाही कुणाला घाबरत’, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. सुप्रिया सुळेंचा रोख करुणा मुंडेंवरून धनंजय मुंडेंवर आहे. गाडीत बंदूक सापडल्याने करुणा मुंडेंना जेलमध्येही जावे लागलं होतं. धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून आपल्या कारमध्ये बंदूक ठेवल्याचा आरोप करुणा मुंडेंनी याआधी केला आहे. तर सुप्रिया सुळेंनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात चर्चेत आलेल्या अवादा कंपनीचाही उल्लेख केला आहे. अवदा कंपनी चांगलं काम करत नाही सांगून केंद्र सरकारला पत्र लिहिली. आता तोच खंडणी मागतो असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. त्यामुळे नेमका रोख कोणाकडे अशी चर्चा सुरू झाली आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…