यंदा राष्ट्रवादी vs राष्ट्रवादी, कुठं काका-पुतण्या, कुठं बाप-लेकात विधानसभेची लढत, ‘या’ मतदारसंघात येणार आमने-सामने
भाजप, शिंदे गट, अजित पवार गटाकड़ून आतापर्यंत उमेदवारी यादी जाहीर करण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे महाविकासआघाडीकडून ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडून उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत होणार असून कुठं कुठं राष्ट्रवादी vs राष्ट्रवादी लढत बघा व्हिडीओ?
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून गेल्या बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत ३८ उमेदवारांना संधी देण्यात आल्याचे पाहायला मिळाले होते. यामध्ये बारामतीतून स्वतः अजित पवार विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत तर याचबरोबर मंत्री छगन भुजबळ, मंत्री दिलीप वळसे पाटील, दत्तात्रय भरणे, हसन मुश्रीफ, दिलीप मोहिते पाटील यांना देखील पक्षाकडून तिकीट जाहीर करण्यात आले आहेत. तर आज राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये इस्लामपूर – डॉ निशिकांत पाटील, तासगाव-कवठे महांकाळ – संजयकाका पाटील, अणुशक्तीनगर – सना मलिक, वांद्रे पूर्व – झिशान सिद्दीकी, वडगाव शेरी – सुनील टिंगरे, शिरुर- ज्ञानेश्वर कटके आणि लोहा – प्रताप चिखलीकर यांना तिकीट देण्यात आलं. तर काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. यानंतर आता शरद पवार विरूद्ध अजित पवार यांची राष्ट्रवादी आमने-सामने आल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे राज्यात काही जागांवर राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी अशी लढत होताना दिसणार आहे. बघा कोणत्या जागांवर राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी असा समना रंगणार?