राष्ट्रवादी काँग्रेस पक्षफुटीनंतर शरद पवार यांची नवी खेळी, काय घेतला मोठा निर्णय?

| Updated on: Jul 27, 2023 | 2:52 PM

VIDEO | पक्षफुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा मोठा डाव, पक्ष मजबूत करण्यासाठी पुढचं पाऊल कोणतं?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षफुटीनंतर शरद पवार यांनी आपल्या हालचाली सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. शरद पवार यांनी पक्षफुटीनंतर नवी खेळी करत माजी आमदारांना पक्षात सक्रिय करण्याचा प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान, यानंतर आता शरद पवार यांच्याकडून भाजपमधील माजी आमदारांना संपर्क साधून त्यांचे मन वळवून शरद पवार त्यांना राष्ट्रवादीत घेणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. तर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांची ही संपूर्ण खेळी असल्याचे म्हटले जात आहे. कारण भाजप सोबत जाण्यासाठी शरद पवार गटावर अजित पवार गटाकडून दबाव येत आहे. मात्र शरद पवार हे भाजप सोबत जाणार नाही अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

Published on: Jul 27, 2023 02:45 PM
#मोदानी आंदोलन : वर्षा गायकवाड म्हणतात, ‘अदानीसाठी टी.डी.आर घोटाळा केला’
सावित्रीबाई फुले यांचा अपमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई अन्…, यशोमती ठाकूर आक्रमक