Solapur | माजी स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुखांच्या कुटुंबियांचं शरद पवारांकडून सांत्वन
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आज सांगोला दौऱ्यावर आहेत. दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट ते घेणार आहेत. तब्बल 50 वर्ष राज्याच्या विधानसभेत आमदार म्हणून आपली कारकीर्द गाजवलेले ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं 30 जुलै रोजी निधन झालं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आज सांगोला दौऱ्यावर आहेत. दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट ते घेणार आहेत. तब्बल 50 वर्ष राज्याच्या विधानसभेत आमदार म्हणून आपली कारकीर्द गाजवलेले ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं 30 जुलै रोजी निधन झालं. गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर शरद पवार अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे सांगोल्यात जाऊन शरद पवार हे गणपतराव देशमुख यांच्या घरी जातील. तिथे त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतील. गणपतराव देशमुखांच्या निधनानंतर विविध पक्षीयांनी शोक व्यक्त केला होता. पवारांनीही ट्विटरवरुन गणपतरावांना श्रद्धांजली अर्पण केली होती.