आघाडी सरकार 5 वर्षे पूर्ण करेन आणि पुन्हा सत्तेत येईल- शरद पवार
येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात बदल होईल का? असा सवाल पवारांना करण्यात आला. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांनी भाष्य केलं. मी यावर बोलू शकत नाही. कारण हा तीन पक्षाचा निर्णय आहे. हे तीन पक्षाचे नेते त्याबाबत निर्णय घेतील. त्याविषयी मला माहीत नाही. मला फक्त एकाच पक्षाबाबत माहीत आहे. ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. […]
येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात बदल होईल का? असा सवाल पवारांना करण्यात आला. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांनी भाष्य केलं. मी यावर बोलू शकत नाही. कारण हा तीन पक्षाचा निर्णय आहे. हे तीन पक्षाचे नेते त्याबाबत निर्णय घेतील. त्याविषयी मला माहीत नाही. मला फक्त एकाच पक्षाबाबत माहीत आहे. ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. राष्ट्रवादीत व्हॅकेन्सी आहे. पण सध्या तरी पक्षात कोणताही बदल करण्यात येणार नाही. रिक्त जागांबाबत पक्ष नेत्यांशी चर्चा करून योग्य ती पावले उचलू, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच आघाडी सरकार 5 वर्षे पूर्ण करेन आणि पुन्हा सत्तेत येईल, असंही त्यांनी सांगितलं.