Sanjay Raut कुणाचे लाडके? शरद पवार की उद्धव ठाकरे? संजय राऊत काय म्हणाले बघा…

| Updated on: Mar 01, 2024 | 4:36 PM

टीव्ही 9 मराठीने आयोजित केलेल्या लोकसभेचा महासंग्राम या कॉन्क्लेव्हमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रोखठोक मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर आपले मत व्यक्त केले.

मुंबई, १ मार्च २०२४ : लोकसभेचं घोडामैदान जवळ आले असून कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणूकांच्या तारखा जाहीर होण्याची परिस्थिती आहे. अशातच टीव्ही 9 मराठीने आयोजित केलेल्या लोकसभेचा महासंग्राम या कॉन्क्लेव्हमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रोखठोक मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर आपले मत व्यक्त केले. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यापैकी आपण दोघांचेही लाडके असल्याचे थेट जाहीरपणे सांगितले. राऊत पुढे असेही म्हणाले की, मी मोदींचा लाडका नाही हे म्हणतात त्याचा आनंद आहे. मी शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांचा लाडका आहे. देशानं ज्यांचं नेतृत्व स्वीकारलं त्यांच्याकडून काही शिकायला मिळालं तर बिघडलं कुठे? असा सवालही त्यांनी केला. तर अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावर बोलताना ते म्हणाले, अशोक चव्हाण ताठ कण्याचे आहेत असे म्हटले जात होते. कारण ते जाणार हे माहीत होते. अजितदादांबद्दलही ताठ कण्याचे म्हणावे लागेल. कारण अजितदादांना जाण्याचा नाद आहे. ते सकाळीही जातात, दुपारीही जातात अशा नादी छंदी लोकांची का चर्चा करता. सोडून द्या असेही ते म्हणाले.

Published on: Mar 01, 2024 04:35 PM
उद्धव ठाकरे भाजपसोबत गेले तर संजय राऊत यांची भूमिका काय असणार?
‘अजित पवार यांचं भाजपसोबत जायचं ठरलं तेव्हा…’ जयंत पाटलांनी सांगितलं त्यावेळी नेमकं काय घडलं?