शरद पवारांनी वाहिली बाबासाहेब पुरंदरेंना श्रद्धांजली
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्राणज्योत मालावली आहे. त्यांच्यावर दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरू होते. आज पहाटे त्यांचे निधन झाले. दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
पुणे – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्राणज्योत मालावली आहे. त्यांच्यावर दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरू होते. आज पहाटे त्यांचे निधन झाले. दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी बोलताना पवार म्हणाले की, इतिहासाबाबत अस्था निर्माण करण्यामध्ये बाबासाहेबांचे मोठे योगदान होते. त्यांनी राज्यभरात हजारो व्याख्याने देऊन तरुणांमध्ये इतिहासाची आवड निर्माण केली. बाबासाहे हे दीर्घायुषी होते, असे पवार यांनी म्हटले आहे.