Sharad Pawar on ST Strike | एसटी विलीनीकरणाचा मुद्दा कोर्टात, त्यावर बोलणार नाही : शरद पवार
एसटीच्या विलीनीकरणाबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, की हायकोर्टाने समिती स्थापन केली आहे. ते त्यावर निर्णय घेणार आहेत. आता हा प्रश्न हायकोर्टाच्या कमिटीपुढे आहे. त्यामुळे मी त्यावर बोलणार नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी शरद पवार यांनी एसटीची आर्थिक स्थितीच वाईट आहे. एसटीचं अर्थकारण कसं सुधारावं यावर अनिल परब यांच्यासोबतच्या बैठकीत चर्चा झाली. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याची कामगारांची मागणी आहे. हायकोर्टाने समिती स्थापन केली आहे. ते त्यावर निर्णय घेणार आहेत. आता हा प्रश्न हायकोर्टाच्या कमिटीपुढे आहे. त्यामुळे मी त्यावर बोलणार नाही. 96 हजार कर्मचारी आहेत. एसटीसह आरोग्य सेविका, आशा वर्कर, खनिकाम करणारे लोक आणि इतर महामंडळं आहेत. एकदा एसटीच्या विलीनीकरणाचं सूत्रं स्वीकारलं तर ते सर्वांना लागू होईल. त्याचं आर्थिक चित्रं काय राहील हे सरकारनं तपासलं पाहिजे, असं पवार म्हणाले.
Published on: Nov 24, 2021 02:50 PM