Sharad Pawar यांनी केंद्र सरकारकडे बोट दाखवण्यापेक्षा राज्य सरकारला निर्देश द्यावे : Bawankule

| Updated on: Aug 17, 2021 | 3:12 PM

शरद पवार यांनी इम्पेरीकल डाटा गोळा करण्यासाठी निधी मिळवून द्यावा,  नाचता येईना अंगण वाकडं’ अशी राज्य सरकारची सध्याची अवस्था झालीय, अशी टीका करत, डिसेंबरपर्यंत ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालं नाही, तर महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. असा इशारा चंद्रशेखर बावनकुळेंचा महाविकास आघाडी सरकारला दिलाय.

‘ओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकारने ताट वाढलंय, पण राज्य सरकारने ओबीसी समाजाचे हात बांधलेय, ओबीसी आरक्षणाचं केंद्र सरकारने समोर केलेलं ताट राज्य सरकार हिसकावून घेत आहेत, राज्य सरकार इम्पेरीकल डाटा गोळा करायला निधी आणि मनुष्यबळ देत नाही, शरद पवार यांनी केंद्र सरकारकडे बोट दाखवण्यापेक्षा राज्य सरकारला याबाबत निर्देश द्यावे’ कालच्या शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर भाजप प्रदेश सरचीटणीस चंद्रशेखर बावनकुळेंनी चोख उत्तर देत, राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. शरद पवार यांनी इम्पेरीकल डाटा गोळा करण्यासाठी निधी मिळवून द्यावा,  नाचता येईना अंगण वाकडं’ अशी राज्य सरकारची सध्याची अवस्था झालीय, अशी टीका करत, डिसेंबरपर्यंत ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालं नाही, तर महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. असा इशारा चंद्रशेखर बावनकुळेंचा महाविकास आघाडी सरकारला दिलाय.
शिरोळमधील पूरग्रस्त आक्रमक, तातडीनं मदत मिळवण्यासाठी मोर्चा
#Tv9podcast | 20 वर्षांपूर्वींचा तालिबान्यांचा कृर चेहरा, राष्ट्रपतींना लटकवलं होतं भर चौकात