पुण्यातल्या भोरच्या थोपटेंच्या भेटीगाठीचा सिलसिला सुरु, शरद पवारांनंतर ‘या’ 4 नेत्यांनी घेतली भेट

| Updated on: Mar 22, 2024 | 10:35 AM

पुण्यातल्या भोरच्या थोपटेंना भेटीगाठीचा सिलसिला सुरु आहे. बारामती लोकसभेत भोर महत्वाचं आहे. भोरमधून अनंतराव थोपटे ६ वेळा आमदार राहिले आहेत आणि त्यांचे पुत्र काँग्रेसचे संग्राम थोपटेचेही आमदारकीची चौथी टर्म असणार आहे. बारामती लोकसभेत दौंड, खडकवासला, भोर, पुरंदर, इंदापूर आणि बारामती या 6 विधानसभा आहेत.

पुण्यातल्या भोरच्या थोपटेंना भेटीगाठीचा सिलसिला सुरु आहे. बारामती लोकसभेत भोर महत्वाचं आहे. थोपटेंना अनेक राजकीय नेते भेटण्यास गेले. सगळ्यात आधी शरद पवार थोपटेंच्या भेटीला गेले. त्यानंतर सुनेत्रा पवारांनी थोपटेंची भेट घेतली. त्यापाठोपाठ बंडाची भूमिका घेणारे विजय शिवतारेंनी थोपटेंची भेट घेत आशीर्वाद मागितला आणि आता अजित पवार गटाचे सुनिल तटकरेही थोपटेंच्या भेटीला पोहोचले. भोरमधून अनंतराव थोपटे ६ वेळा आमदार राहिले आहेत आणि त्यांचे पुत्र काँग्रेसचे संग्राम थोपटेचेही आमदारकीची चौथी टर्म असणार आहे. बारामती लोकसभेत दौंड, खडकवासला, भोर, पुरंदर, इंदापूर आणि बारामती या 6 विधानसभा आहेत. 2019 च्या लोकसभेत राष्ट्रवादीच्या सुळेंविरोधात भाजपच्या कांचन कूल लढल्या होत्या. सुळेंना 6 लाख 86 हजार 714 मतं मिळाली. तर भाजपच्या कांचन कूल 1 लाख 55 हजारांहून अधिकच्या मतांनी पराभूत झाल्या होत्या. दरम्यान, पवारांमधल्या फुटीनं यंदा बारामती लोकसभेतला प्रत्येक मतदारसंघाची भूमिका महत्वाची आहे. काही दिवसांपूर्वीच भोरमध्ये महाविकासआघाडीची प्रचंड मोठी सभा झाली होती., त्या सभेतून भोरमध्ये थोपटेंच वर्चस्व आहे, पुन्हा एकदा सिद्ध झालं. यंदा सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचे पाय भोरकडे वळतायत. त्यामुळे यंदाच्या लोकसभेत नेमकं काय होणार? याची चर्चा सुरू होतेय.

 

 

Published on: Mar 22, 2024 10:35 AM
अमरावतीच्या जागेवरुन तिढा कायम, राणा-अडसूळांमध्ये रस्सीखेच सुरूच, कुणाला मिळणार तिकीट?
उमेदवार पडल्यास आम्ही… रामराजे निंबाळकरांचा रणजितसिंहांना विरोध कायम आणि भाजपला दिला इशारा