Narayan Rane | शरद पवार तोडगा कधीच काढत नाहीत, खेळवत ठेवणं त्यांचं काम – नारायण राणे

| Updated on: Nov 22, 2021 | 7:52 PM

नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. राणे म्हणाले की, शरद पवार तोडगा कधीच काढत नाहीत, खेळवत ठेवणं हेच त्यांचं काम आहे. ते एसटी कामगारांच्या संपावर तोडगा काढणार नाहीत.

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. मागील तेरा दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदान तसेच राज्यभर हे आंदोलन केले जात आहे. 13 दिवस उलटून गेले असले तरी राज्य सरकारकडून कोणताही ठोस तोडगा काढला जात नाहीये. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केलीय. तसेच या प्रकरणात केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा असेदेखील राणे यांनी म्हटले आहे. ते सिंधुदुर्गमध्ये बोलत होते. दरम्यान, नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. राणे म्हणाले की, शरद पवार तोडगा कधीच काढत नाहीत, खेळवत ठेवणं हेच त्यांचं काम आहे. ते एसटी कामगारांच्या संपावर तोडगा काढणार नाहीत.

Published on: Nov 22, 2021 07:31 PM
Nitesh Rane | एसटीची अवस्था वाईट, अनिल परब यांनी तासभर एसटीच्या सीटवर बसावं : नितेश राणे
Breaking | कल्याण-डोंबिवलीत भाजपला मोठा धक्का, 3 भाजप नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश