Sharad Pawar | पवार पॅलेसचा लाभ घ्या मात्र, लाभ घेताना भाडं नक्की द्या – शरद पवार

| Updated on: Nov 07, 2021 | 6:03 PM

आपल्या भाषणात टिप्पणी करताना शरद पवार म्हणाले या वास्तूच्या समोरील रोडवरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना प्रश्न पडेल की "पवार पॅलेस" या वास्तूचा नक्की मालक कोण? याच विचारात लोक गोंधळून जातील. पवारांच्या या वक्तव्यानं उपस्थितांमध्ये हशा पिकला. ही वास्तू दौंड तालुक्यातील वैभवात भर पाडणारी आहे. त्यामुळे या वास्तूचा नक्कीच सर्वांनी लाभ घ्यावा. मात्र, लाभ घेताना भाड नक्कीच द्यावं, अशी मिश्किल टिप्पणीनीही पवारांनी आपल्या भाषणात केली.

दौंड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष अप्पासाहेब पवार यांच्या ‘पवार पॅलेस’ या मंगल कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. दौंड तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अप्पासाहेब पवार यांनी या कार्यालयास “पवार पॅलेस” असं नाव दिले आहे.

याबाबत आपल्या भाषणात टिप्पणी करताना शरद पवार म्हणाले या वास्तूच्या समोरील रोडवरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना प्रश्न पडेल की “पवार पॅलेस” या वास्तूचा नक्की मालक कोण? याच विचारात लोक गोंधळून जातील. पवारांच्या या वक्तव्यानं उपस्थितांमध्ये हशा पिकला. ही वास्तू दौंड तालुक्यातील वैभवात भर पाडणारी आहे. त्यामुळे या वास्तूचा नक्कीच सर्वांनी लाभ घ्यावा. मात्र, लाभ घेताना भाड नक्कीच द्यावं, अशी मिश्किल टिप्पणीनीही पवारांनी आपल्या भाषणात केली.

Sunil Patil Live | समीर वानखेडेंशी माझा काही संपर्क नाही : सुनील पाटील
Ravi Rana | अनिल परब यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा, आमदार रवी राणा यांची मागणी