ब्राम्हण महासंघाकडून शरद पवारांना नकार ! भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

| Updated on: May 20, 2022 | 7:13 PM

शरद पवारांनी अमोल मिटकरी (Amol Mitkari) आणि भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यावर आपली भूमिका स्पष्ट करण्याची ब्राम्हण संस्थांची मागणी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यावरून जोरदार वाद सुरू होता. लग्न लागताना होणारे मंत्रोच्चार आणि इतर विधीवरून मिटकरी यांनी वादग्रस्त विधान केले होते.

पुणे : ब्राह्मण महासंघाने (Brahmin Federation) शरद पवारांची (Sharad Pawar) भेट नाकारली आहे. राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरी यांच्या विधानाचे गंभीर पडसाद उमटताना दिसत आहेत. शरद पवारांनी उद्या संध्याकाळी ब्राह्मण महासंघाला भेटीसाठी आमंत्रण दिले होते. मात्र त्यांनी ही भेट नाकारत मोठा धक्का दिला आहे. तसेच शरद पवारांनी अमोल मिटकरी (Amol Mitkari) आणि भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यावर आपली भूमिका स्पष्ट करण्याची ब्राम्हण संस्थांची मागणी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यावरून जोरदार वाद सुरू होता. लग्न लागताना होणारे मंत्रोच्चार आणि इतर विधीवरून मिटकरी यांनी वादग्रस्त विधान केले होते.

अमोल मिटकरींच्या विधानावर भूमिका स्पष्ट करा, ब्राह्मण महासंघाची शरद पवारांकडे मागणी
नृसिंहाच्या आशीर्वादाने फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील – हर्षवर्धन पाटील