Sharmila Thackeray : ‘तर आम्हाला निवडून द्या…’, शर्मिला ठाकरेंनी अमित ठाकरेंच्या रॅलीतून महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन

| Updated on: Oct 28, 2024 | 1:08 PM

मुंबईतील माहिम विधानसभा मतदारसंघात मनसे विरुद्ध एकनाथ शिंदेंची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना अशी बिग फाईट पाहायला मिळणार आहे. माहिम मतदारसंघातून मनसेकडून अमित ठाकरे, ठाकरे गटाकडून महेश सावंत तर शिंदे गटाकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर हे रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे माहिम मतदारसंघात यंदा तिहेरी लढत रंगताना दिसणार आहे.

Follow us on

मुंबईतील माहिम या विधानसभा मतदारसंघातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे हा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अमित ठाकरे यांना विधानसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. आज अमित ठाकरे यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहे. यासाठी मनसेकडून साधेपणाने पायी रॅली काढण्यात आल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये राज ठाकरे यांच्या पत्नी आणि अमित ठाकरे यांची आई शर्मिला ठाकरे देखील सहभागी झाल्या आहेत. यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘आपला मुलगा लढाईला उतरला असताना आनंद झालाय. त्याला आमचा पाठिंबा आहे. पैशाचं बळ विरूद्ध जनतेचं बळ अशी लढाई आम्ही लढणार आहोत. लोकांना ठरवायचं आहे. त्यांना पैसा हवाय की काम करणारा माणूस हवाय…’, असं त्या म्हणाल्या. गेली पाच वर्ष जनतेने सर्व कारभार बघितलेला आहे. जर तुम्हाला काम करुन हवी असतील तर आम्हाला निवडून द्या आणि जर जनतेला पाच वर्षातून एकदा पैसे हवे असतील तर त्यांना निवडून द्या, असं आवाहन शर्मिला ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला केलंय.