साईडट्रॅक केलेल्या पंकजा मुंडे यांचा फोटो बॅनरवर झळकला, नाराजी दूर? ‘शासन आपल्या दारी’त होणार सहभागी?

| Updated on: Dec 05, 2023 | 1:22 PM

बीडच्या परळीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या स्वागतासाठी शेकडो बॅनर्स तसेच कमानी उभारण्यात आल्याने शासकीय कार्यक्रमाला राजकीय स्वरूप, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बॅनरवर बऱ्याच दिवसापासून साईडट्रॅक करण्यात आलेल्या पंकजा मुंडे यांचा फोटो लावण्यात आल्याने चर्चेला उधाण

Follow us on

बीड, ५ डिसेंबर २०२३ : कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघात आज शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. परळीतील ओपळे मैदानावर शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या स्वागतासाठी शेकडो बॅनर्स तसेच कमानी उभारण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कार्यक्रमस्थळापर्यंत बॅनर आणि तिरंग्याच्या कमानी उभारण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे शासकीय कार्यक्रमाला राजकीय स्वरूप आल्याचे पाहायला मिळत आहे. परळी शहरात मोठी बॅनरबाजी करण्यात आली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बॅनरवर बऱ्याच दिवसापासून साईडट्रॅक करण्यात आलेल्या पंकजा मुंडे यांचा फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. पहिल्यांदाच पंकजा मुंडे यांचा फोटो वापरल्याने उत्सुकता वाढली आहे. त्यामुळे कार्यक्रमाला पंकजा मुंडे उपस्थित राहणार असल्याची चर्चा असल्या तरी कार्यक्रम पत्रिकेवर पंकजा मुंडे यांचे नाव नसल्याचेही सांगितले जात आहे.