मला इंग्रजी येत नाही… रवींद्र धंगेकरांच्या साधेपणाला शशी थरूर यांची साद, असं केलं कौतुक
पुण्यात काँग्रेस नेते शशी थरूर यांचा युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान पुणे लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी स्पष्ट सांगितलं मला इंग्रजी येत नाही अन्....
पुण्यात काँग्रेस नेते शशी थरूर यांचा युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला तरुणांनी मोठी गर्दी केली होती. अनेक तरुणांच्या प्रश्नांना शशी थरूर अगदी अभ्यासपूर्ण उत्तर देत असल्याचे या कार्यक्रमात पाहायला मिळाले. दरम्यान पुणे लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमाला मी आलो आहे. कारण शशी थरूर साहेब याठिकाणी आले आहेत पण माझी पदयात्रा असल्यामुळे मला लवकर जावं लागतंय. मला इंग्रजी बोलता येत नाही, असं सहजपणे धंगेकर यांनी मान्य केलं. यालाच उत्तर देताना मात्र शशी थरूर यांनी ज्याचे मन साफ असेल त्याला कुठल्याच भाषेच बंधन असू शकत नाही, असं उत्तर दिलं. यानंतर सभागृहात उपस्थितांमधून एकच टाळ्यांचा कडकडाट झाल्याचे पाहायला मिळाले.
Published on: May 06, 2024 12:15 PM