Shashikant Shinde | ईडी, आयटीच्या बापाला आम्ही घाबरत नाही, शशिकांत शिंदेंचा सोमय्यांवर हल्लाबोल
साताऱ्यातल्या शेतकरी मेळाव्यात बोलताना शशिकांत शिंदे चांगलेच आक्रमक झाले होते. आम्ही ईडीला पळवून लावणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही. मागे इकडे किरीट सोमय्या आले होते. मी दादांना म्हटलं होतं, मला परवानगी द्या, त्यांना मी बघून घेतो, पण दादांनी सांगितलं सबुरीने घ्या. म्हणून शांत बसावं लागलं, असं शशिकांत शिंदे म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मी म्हटलं होतं, मला परवानगी द्या, बेछूट आरोप करणाऱ्या किरीट सोमय्यांना मी पाहून घेतो. पण दादांनी सांगितलं शांततेने घ्या, म्हणून मी शांत बसलो, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री शशिकांत शिंदे भाजपवर आणि किरीट सोमय्यांवर तुटून पडले. भाजपचं माझ्यावर अजूनही प्रेम आहे. मला 100 कोटींची ऑफर दिली, असा गौप्यस्फोटही त्यांनी पुन्हा एकदा केला.
साताऱ्यातल्या शेतकरी मेळाव्यात बोलताना शशिकांत शिंदे चांगलेच आक्रमक झाले होते. आम्ही ईडीला पळवून लावणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही. मागे इकडे किरीट सोमय्या आले होते. मी दादांना म्हटलं होतं, मला परवानगी द्या, त्यांना मी बघून घेतो, पण दादांनी सांगितलं सबुरीने घ्या. म्हणून शांत बसावं लागलं, असं शशिकांत शिंदे म्हणाले.
त्याचबरोबर शिंदे यांनी 100 कोटीच्या ऑफरचा पुनरुच्चार केला. ‘भाजपचं आजही माझ्यावर प्रेम आहे. त्यावेळी त्यांनी 100 कोटीची ऑफर दिली होती. त्यावेळी ते 100 कोटी घेतले असते तर बरं झालं असतं. पण भाजपलाही माहिती आहे की मी शरद पवार यांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. मी मेलो तरी शरद पवारांना सोडणार नाही, असं वक्तव्य शिंदे यांनी केलं आहे.