Sharad Pawar | शशिकांत शिंदेनी निवडणूक गांभीऱ्याने घ्यायला हवी होती- शरद पवार

| Updated on: Nov 24, 2021 | 4:13 PM

सातारा जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. जावळी सोसायटी गटातून शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला. तर ज्ञानदेव रांजणे यांनी बाजी मारली आहे.

सातारा जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. जावळी सोसायटी गटातून शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला. तर ज्ञानदेव रांजणे यांनी बाजी मारली आहे. शशिकांत शिंदे यांना 24 तर रांजणे यांना 25 मतं मिळाली. शिंदे यांच्या पराभवानंतर समर्थक चांगलेच भडकले होते. त्यांनी राष्ट्रवादीच्याच कार्यालयावर दगडफेक केल्याची घटना काल घडली होती. त्यानंतर शिंदे यांनी समर्थकांच्या कृत्यावरुन दिलगिरीही व्यक्त केली होती. दरम्यान, शिंदे यांच्या या पराभवावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलंय.

Sitaram Kunte Breaking | राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटेंना ईडीचं समन्स
Nagpur | नागपुरात सुरक्षारक्षकांच्या दारू पार्टीचा व्हिडिओ व्हायरल