शशिकांत शिंदे समर्थकांकडून राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक; दंगेखोरांना सडेतोड उत्तर देऊ, विजयी उमेदवार रांजणेंचा इशारा
जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला आहे. या धक्कादायक पराभवामुळे शिंदे समर्थकांकडून राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक करण्यत आली आहे. दरम्यान या घटनेवर विजयी उमेदवार
सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला आहे. या धक्कादायक पराभवामुळे शिंदे समर्थक प्रचंड संतापले आहेत. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वामुळेच शिंदे यांचा पराभव झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थेट पक्ष कार्यालयावरच हल्ला चढवला आहे. दरम्यान या निवडणुकीमध्ये विजयी झालेले उमेदवार ज्ञानदेव रांजणेंकडून या घटनेवर संताप व्यक्त करण्यात आला आहे. शशिकांत शिंदे यांच्या बगलबच्च्यांना सडेतोड उत्तर देऊन अशी प्रतिक्रिया रांजणे यांनी दिली आहे.
Published on: Nov 23, 2021 12:16 PM