‘त्या’ व्हायरल व्हिडीओनंतर मुख्यमंत्र्यांचा फोन आला अन्, शितल म्हात्रे पत्रकार परिषदेत म्हणाल्या…
VIDEO | 'त्या' व्हायरल व्हिडीओनंतर शितल म्हात्रे यांची संतप्त प्रतिक्रिया, बघा सविस्तर पत्रकार परिषद
मुंबई : शिवसेना पक्षाच्या नेत्या आणि प्रवक्त्या शितल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे या दोघांचा एक व्हीडिओ मॉर्फ करुन व्हायरल करण्यात आला. याप्रकरणी शितल म्हात्रे यांनी संताप व्यक्त करत पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. स्त्री म्हणून आज वेदना होत आहेत. शिंदेंसोबत गेल्याने माझ्यावर गलिच्छ आरोप करण्यात आले, अशा शब्दात शितल म्हात्रे यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला. या व्हायरल व्हिडीओ संदर्भात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून यापैकी 1 अंधेरीतील पदाधिकारी तर दुसरा दहीसरमधील कार्यकर्ता आहे. ठाकरे गटाच्या आयटी सेलकडून हा व्हिडीओ लवकरात व्हायरल करण्याचे आदेश दिले जात होते. पायखालची वाळू सरकरल्यानंतर माणून अशा थराला जातो, असे म्हणत शिवसेना पक्षाच्या नेत्या आणि प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी सवाल उपस्थित केला. हा व्हिडीओ ठाकरे गटाच्या अनेक फेसूबक पेजवरुन शेअर करण्यात आला. बोलण्यासारखं काहीही नसलं की चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते.