Special Report | शिंदे-भाजप सरकारपुढे तंटे मिटवण्याचं आव्हान

| Updated on: Aug 07, 2022 | 10:56 PM

भविष्यात शिंदे-भाजपमधून ज्यांचे-ज्यांचे खटके उडू शकतात. ते फक्त राणे आणि केसरकरच नाहीयत. पहिलं नाव आहे भाजपचे किरीट सोमय्या आणि काही शिंदे समर्थक. उदाहरणार्थ आमदार प्रताप सरनाईक, आमदार यामिनी जाधव आणि खासदार भावना गवळी. पहिला खटका सोमय्यांच्या आरोपांवरुनच उडाला होता. तेव्हा सोमय्यांनी भाजपनं समज दिल्याचा दावा केसरकरांनी केला. त्यानंतर सोमय्यांनी घोटाळ्यांबद्दल बोलताना कधीच सरनाईक, यामिनी जाधव आणि भावना गवळींचं नाव घेतलं नाही.

मुंबई :जसं मविआच्या प्रयोगानंतर काही राजकीय प्रतिस्पर्धी सत्तेच्या बाकांवर एकमेकांच्या शेजारी येऊन बसले होते. तसंच शिंदे-भाजप सरकारमध्येही(Shinde-BJP government) झालंय. त्यात सर्वात आघाडीवर आहेत राणे आणि केसरकर. आधी मातोश्रीवर भांडी धुवा अशी टीका केल्यानंतर आता निलेश राणेंनी केसकरांसाठी आमच्याकडे ड्रायव्हरची नोकरी नोकरी असल्याचं म्हटलंय.

भविष्यात शिंदे-भाजपमधून ज्यांचे-ज्यांचे खटके उडू शकतात. ते फक्त राणे आणि केसरकरच नाहीयत. पहिलं नाव आहे भाजपचे किरीट सोमय्या आणि काही शिंदे समर्थक. उदाहरणार्थ आमदार प्रताप सरनाईक, आमदार यामिनी जाधव आणि खासदार भावना गवळी. पहिला खटका सोमय्यांच्या आरोपांवरुनच उडाला होता. तेव्हा सोमय्यांनी भाजपनं समज दिल्याचा दावा केसरकरांनी केला. त्यानंतर सोमय्यांनी घोटाळ्यांबद्दल बोलताना कधीच सरनाईक, यामिनी जाधव आणि भावना गवळींचं नाव घेतलं नाही.

इकडे औरंगाबादेत खोतकर आणि दानवेंमध्ये दिलजमाई झालीय खरी., शिंदे-गट आणि भाजप एकत्र आलंय. मात्र जालना लोकसभेतून कोण लढणार., हा पेच कायम आहे. सिल्लोडमधून जेव्हा अब्दुल सत्तार भाजपमध्ये येणार होते, तेव्हा सिल्लोडच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी त्याला विरोध केल्यामुळे सत्तार शिवसेनेत गेले. आता सत्तारांना शिंदे आणि भाजपला कार्यकर्त्यांना सोबत घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरायचं आहे.

नंतर वाद आहेत बुलडाण्यामध्ये. बुलडाण्यातल्या जळगाव जामोदचे भाजप आमदार संजय कुटे आणि बुलडाण्याचे शिंदे गटातले
आमदार संजय गायकवाड. कोरोना काळात या दोन्ही नेत्यांमधला संघर्ष पुतळे आणि गाड्या पेटवण्यापर्यंत गेला होता. मात्र आता
शिंदे-भाजप युतीचा धर्म या दोन्ही नेत्यांना पाळावा लागणाराय.

रावसाहेब दानवेंनी लोकसभेत भाजपचं मिशन ४८ असण्याचं विधान करुन गोंधळ उडवून दिलाय. कारण, महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. मात्र शिंदे गट-भाजपच्या युतीनंतर शिवसेनेचे 12 खासदार शिंदे गटात आले आहेत.  मग जर भाजप 48 च्या 48 जागा लढवणार असेल, तर मग शिंदेंकडच्या 12 खासदारांनी काय करावं, हा प्रश्न पडलाय. मात्र दानवेंच्या या विधानानंतर फडणवीसांनी स्पष्टीकरण देत काय मह्टलंय.

एक सरकार जाऊन दुसरं सरकार बनलंय., मात्र दावे आणि विधानांमधला संभ्रम काही मिटलेला नाही. आदित्य ठाकरे एकीकडे बंडखोरांना गद्दार म्हणतायत., आणि दुसरीकडे मातोश्रीची दारं उघड असल्याचंही सांगतायत. एकनाथ शिंदे आम्ही शिवसेना असल्याचं म्हणतायत., दुसरीकडे चिन्हं कुठलंही मिळालं तरी फरक पडणार नसल्याचंही सांगतायत. आधी मतदारसंघातही आमची भूमिका मान्य आहे, असं म्हणणारे गुलाबरावांनीही नंतर वेगळं विधान केलं होतं. काही दिवसांपूर्वी शहाजीबापू पाटील आता शिवसेना शिंदेंचीच असल्याचं म्हटले होते., आता तेच शहाजीबापू पुन्हा शिंदे-ठाकरेंना एकत्र येण्याचं आवाहन करतायत.

Published on: Aug 07, 2022 10:56 PM
Special Report | नीती आयोगाच्या बैठकीला गेलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिसऱ्या रांगेत
Eknath Khadse Video : हम तो डुबेंगे सनम, तुमको भी साथ लेकर डुबेंगे! एकनाथ खडसेंची टीका, पाहा व्हिडीओ