MLA Lata Sonawane | शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणे यांची आमदारकी धोक्यात, सर्वोच्च न्यायलयाने याचिका फेटाळली

| Updated on: Sep 11, 2022 | 4:50 PM

MLA Lata Sonawane | शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणे यांची आमदारकी धोक्यात आली आहे. सर्वोच्च न्यायलयाने याचिका फेटाळली

MLA Lata Sonawane | शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणे यांची आमदारकी धोक्यात आली आहे. सर्वोच्च न्यायलयाने (Supreme Court) याचिका फेटाळली. यापूर्वी त्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानेही (High Court) दणका दिला होता. जळगाव जिल्ह्यातील चोपडा मतदारसंघाच्या (Chopada constituency ) शिवसेनेच्या आमदार (Sena MLA) लताबाई चंद्रकांत सोनवणे (Latabai Sonawane) यांचे अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवले होते. समितीविरोधात त्यांनी शड्डू ठोकले होते. या निर्णयाविरोधात त्यांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. पण याचिका फेटाळण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
चोपडा मतदार संघ 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी(SC) राखीव ठेवण्यात आला होता. आ. सोनवणे या शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीतर्फे जगदीशचंद्र वळवी यांनी निवडणूक लढवली होती. वळवी यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी सातत्याने सोनवणे यांच्या जात वैधता प्रमाणपत्राला आक्षेप घेतला होता. शिंदे गट शिवसेनेतून बाहेर पडल्यावर त्या शिंदे गटासोबत गेल्या.

Published on: Sep 11, 2022 04:50 PM