शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत जाहीर
VIDEO | मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून वारिसेंच्या कुटुंबीयांना मदत, रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती
मुंबई : रत्नागिरी येथील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. ही मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जाहीर करण्यात आल्याची माहिती रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. दरम्यान, शशिकांत वारिसे यांचा अपघात हा घातपात असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने करण्यात येतोय. तसेच या हत्येमागील मास्टर माइंडचा शोध घेऊन त्याला शिक्षा द्या, अशी मागणीही जोर धरत असताना आता उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी एसआयटी अर्थात स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम मार्फत करण्याचे आदेश दिलेत. लवकरात लवकर एसआयटी स्थापन करून या प्ररकणाचा तपास करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
Published on: Feb 12, 2023 03:25 PM