सरकार ‘या’ पदांसाठी कंत्राटी भरती करणार, आरक्षणाला कात्री; विरोधकांसह अनेक तरुण बेरोजगार
tv9 Special Report | सरकारनं विविध विभागातल्या 75 हजार जागा कंत्राटी पद्धतीनं भरण्याचा घेतला निर्णय, कोणत्या पदांवर सरकार करणार कंत्राटी भरती, बघा टीव्ही ९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट...
मुंबई, १२ सप्टेंबर २०२३ | सरकारची अनेक पदं आता कंत्राट पद्धतीनं भरले जाणार आहेत. त्यामुळे विरोधकांबरोबरच अनेक तरुण बेरोजगारही याविरोधात आक्रमक होत आहेत. एकीकडे आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आणि ओबीसी समाजानं रस्त्यावर उतरुन आंदोलनं केली पण दुसरीकडे त्याचवेळी सरकारनं विविध विभागातल्या 75 हजार जागा कंत्राटी पद्धतीनं भरण्याचा निर्णय घेतला. यामध्ये क्लास वन ते क्लास फोर पर्यंतच्या 132 प्रकारच्या पदांचा समावेश आहे. म्हणजे ज्या शेकडो पदांसाठी बेरोजगार तरुण सरकारी नोकरीची आशा लावून बसले होते, त्यांना आता कंत्राटी म्हणून काम करावं लागेल. शिवाय या कंत्राटी नोकर भरतीत कोणतंही आरक्षणही लागू नसेल. विविध खात्यांमध्ये आता सरकार कंत्राटी भरती करणार आहे. ज्यात ग्रंथपाल, शिपाई, सरकारी कर्मचारी, इंजिनीअर, व्यवस्थापक, संशोधक, अधीक्षक, प्रकल्प समन्यवक, अशी पदं आता कंत्राटी पद्धतीनं भरली जाणार आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट