मराठा आरक्षणासंदर्भात शिंदे सरकार मोठा निर्णय घेणार? हिवाळी अधिवेशनात नेमकं काय घडणार?
महाराष्ट्रात हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होतंय. तर संसदेचं अधिवेशन हे ४ डिसेंबरपासून सुरू होतंय. या दोन्ही अधिवेशनाकडे लक्ष लागून राहिले आहे. महाराष्ट्रात आरक्षणाची मर्यादा वाढवली जाऊ शकते तर मोदी सरकार जातीय जनगणनेचा निर्णय घेऊ शकतं
मुंबई, ३० नोव्हेंबर २०२३ : मराठा आरक्षणावरून शिंदे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे. बिहार सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकार आरक्षणाची मर्यादा वाढवू शकत का? अशा चर्चा सुरू झाल्यात. बिहारमध्ये नितेश कुमार यांनी ५० टक्क्यांची मर्यादा वाढवून ७५ टक्के इतकी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होतंय. तर संसदेचं अधिवेशन हे ४ डिसेंबरपासून सुरू होतंय. या दोन्ही अधिवेशनाकडे लक्ष लागून राहिले आहे. महाराष्ट्रात आरक्षणाची मर्यादा वाढवली जाऊ शकते तर मोदी सरकार जातीय जनगणनेचा निर्णय घेऊ शकतं असं सांगितलं जातंय. बिहार राज्याने स्वतःहा जातीय जनगणना केली त्याआधारे आरक्षणाची मर्यादा वाढवली. कुठल्या राज्यात किती आहे आरक्षण? बघा स्पेशल रिपोर्ट