देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर त्र्यंबकेश्वर मंदिर घटनेप्रकरणी कारवाई सुरू, काय आहे प्रकरण?

| Updated on: May 16, 2023 | 2:37 PM

VIDEO | त्र्यंबकेश्वर मंदिर घटनेप्रकरणाच्या तपासासाठी सरकारकडून SIT स्थापन, गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर अधिकारी अॅक्शनमोडमध्ये...

नाशिक : शनिवारी महाराष्ट्रातील नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरात इतर धर्माच्या लोकांच्या जमावाने जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली होती. मात्र, मंदिराच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे तो यशस्वी होऊ शकला नाही. मंदिर व्यवस्थापन समितीच्या सूचना आहेत की हिंदूंव्यतिरिक्त इतर कोणत्याही धर्माच्या लोकांना मंदिरात प्रवेश करता येणार नाही. हे मंदिर भगवान शंकराच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असून या मंदिरावर करोडो लोकांची श्रद्धा आहे. या घटनेनंतर मंदिर समितीने याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. या घटनेचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता सरकारने या घटनेच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक SIT स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात गेल्या वर्षीही अशीच एक घटना समोर आली होती. यामुळेच सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेत सविस्तर चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यानंतर त्र्यंबकेश्वर मंदिर घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास सुरूवात झाली आहे.

Published on: May 16, 2023 02:37 PM
लोकसभेसाठी मविआचा 16-16 फॉर्म्यला? आव्हाड म्हणतात…
16 MLAs Disqualification | 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कधी देणार, राहुल नार्वेकर यांनी स्पष्टच म्हटले…