‘कुठला विषय शिकवता हे विचारण्याची गरज काय?’, शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडेंनी अधिकाऱ्यांना सुनावलं

| Updated on: Jun 26, 2024 | 12:51 PM

नाशिक शिक्षक मतदारसंघातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाचे शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे चांगलेच आक्रमक झाले आहेत. येवल्यातील मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलंच खडेबोल सुनावल्याचे पाहायला मिळाले आहे.

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान पार पडत आहे. नाशिक जिल्ह्यात निवडणुकीसाठी १३ हजार १२२ शिक्षक मतदार आहेत. यामध्ये ९ हजार ६७३ पुरूष आहेत. तर ३ हजार ४४९ स्त्रिया आहेत. दरम्यान, नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीकडून शिंदे गटाचे किशोर दराडे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे महेंद्र भावसार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने महायुतीत बिघाडी झाली का? अशी चर्चा होतेय.अशातच नाशिक शिक्षक मतदारसंघातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाचे शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे चांगलेच आक्रमक झाले आहेत. येवल्यातील मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलंच खडेबोल सुनावल्याचे पाहायला मिळाले आहे. ओळखपत्र सोबत असताना कुठला विषय शिकवता हे विचारण्याची गरज काय? असा सवाल करत मतदान अधिकाऱ्यांवर किशोर दराडे चांगलेच संतपाले.

Published on: Jun 26, 2024 12:51 PM
Kokan MLC Election : कोकण पदवीधरसाठी 13 उमेदवार मैदानात, रमेश कीर vs निरंजन डावखरेंमध्ये लढत; मतदानासाठी गर्दी
‘… गुन्हा आहे का?’, लोकसभेतील ‘त्या’ घोषणेनंतर संजय राऊतांकडून ओवैसी यांची पाठराखण