उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावर परिणाम, त्यांना उपचारांची गरज, कुणाची जिव्हारी लागणारी टीका?
उद्धव ठाकरे यांचं आजारपण वाढत चाललंय, त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांना उपचारांची गरज आहे. माजी मुख्यमंत्री म्हणून नारायण राणे यांच्यावर जशी कारवाई करण्यात आली होती. त्यापेक्षाही कडक कारवाई सरकारने उद्धव ठाकरे यांच्यावर करावी, कुणी केली सरकारकडे थेट मागणी?
नवीदिल्ली, २९ नोव्हेंबर २०२३ : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेली टीका आणि त्यासाठी वापरलेला शब्द हा असंसदीय आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका होत असताना शिंदे गटातूनही आता उद्धव ठाकरे यांना घेरण्यात येत आहे. अशातच शिंदे गटाचे नेते किरण पावसकर यांनी देखील या टीकेवर भाष्य करताना म्हणाले की, उद्धव ठाकरे मातोश्रीवरून मंत्रालयात पोहोचत नव्हते असे म्हणत उद्धव ठाकरे यांचं आजारपण वाढत चाललंय, त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांना उपचारांची गरज आहे, असे म्हणत शिंदे गटाचे नेते किरण पावसकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. तर उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत किरण पावसकर म्हणाले, माजी मुख्यमंत्री म्हणून नारायण राणे यांच्यावर जशी कारवाई करण्यात आली होती. त्यापेक्षाही कडक कारवाई सरकारने उद्धव ठाकरे यांच्यावर करावी, अशी थेट मागणी किरण पावसकर यांनी केली.