कोणत्याही प्रकरणात मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊ नये, शिंदे गटातील नेत्याचा राष्ट्रवादीला सल्ला

| Updated on: Feb 17, 2023 | 1:36 PM

VIDEO | शिंदे गटातील नेते नरेश म्हस्के यांचा जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीवर निशाणा, काय म्हणाले बघा...

ठाणे : आरोप प्रत्यारोपांची मालिका ठाणे शहरात सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्युपिटर रूग्णालयात ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांची भेट घेतली. हे चुकीचे असल्याचे सांगत काल मुख्यमंत्र्यांनी महेश आहेर यांची भेट घेतली नसल्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले आहे. जवळच्या अधिकाऱ्यावर रूग्णालयात उपचार सुरू असून ते त्यांना भेटण्यासाठी गेले होते, परंतु काही लोकं सहानभुती घेण्यासाठी कोणतेही आरोप मुख्यमंत्र्यांवर करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुढे ते असेही म्हणाले की, जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेबाबत ठाण्यातील सी.पी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुचना दिल्या असून जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबियांची काळजी घेण्यास दक्ष राहावं, अशाही सुचना दिल्या असल्याचे नरेश म्हस्के यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले. शिवाय कोणत्याही प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेऊ नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

शशिकांत वारिसे यांच्या हत्येप्रकरणी सरकारला घेरलं! हत्येवेळीच सीसीटीव्ही बंद कसे? संजय राऊत यांचा सवाल
उन्हाचा पारा चढलेला त्यात चंद्रकांत पाटील यांचे ‘ते’ विधान, रोहित पवार यांचा संताप का वाढला ?