सकाळचा शपथविधी बंड की गद्दारी? नरेश म्हस्के यांनी अजित पवार यांना सुनावलं
VIDEO | सकाळच्या शपथविधीवरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांना सुनावलं, काय म्हणाले शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के?
पुणे : सातत्याने शिंदे गटातील आमदारांनी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गद्दारी केली बंडखोरी केली असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. याला शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मराठी एक म्हण आहे, स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पहायचं वाकून अशी परिस्थिती सध्या अजितदादांची झालेली आहे. तुम्हाला 23-11-2019 सकाळ आठवली असेल तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितलं अजित दादा सकाळी शपथविधीला गेले तेव्हा दात न घासता गेले होते त्यांना घाई झाली होती. राज्यपालांकडे शपथ विधी करण्याची त्यांना किती घाई झाली होती. एकनाथ शिंदे यांनी बंड केलं म्हणतात मग तुम्ही केलं ते काय होतं ? शरद पवार साहेबांना सोडून तो शपथविधी घेतला होता, ती गद्दारी होती का शरद पवार साहेबांच्या विरुद्धचा उठाव होता ? असा साधा प्रश्न मी त्यांना पुण्यात बसून विचारत आहे असं शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी म्हंटलं आहे.