संजय राऊत यांच्या धमक्यांना नाहीतर…, शिंदे गटाच्या नेत्यानं सांगितले शिवसेनेतून बाहेर पडण्याचं कारण

| Updated on: Jan 31, 2023 | 3:18 PM

संजय राऊत यांनी शिंदे गटाला आव्हान देत शिवसेना का सोडली हे एकदा स्पष्ट करावे, असा सवाल केला होता, या प्रश्नाला शिंदे गटाने दिले उत्तर

मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या धमक्यांना कंटाळून शिंदे गटाने शिवसेना पक्ष सोडला, अशा चर्चां सध्या सुरू आहे. अशातच संजय राऊत यांनी शिंदे गटाला आव्हान देत शिवसेना का सोडली हे एकदा स्पष्ट करावे, असा सवाल केला होता, या प्रश्नाला शिंदे गटातील नेत्याकडून उत्तर देण्यात आले आहे. शिंदे गटाच्या नेत्यानं शिवसेनेतून बाहेर पडण्याचं कारण सांगितले आहे.  शिंदे गटाचे नेते आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी यावर प्रतिक्रिया देताना असे म्हटले की, शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी वेगवेगळी कारणं आणि वेगवेगळे अनुभव शिंदे गटातील आमदार खासदारांना आहेत.

पुढे ते असेही म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेशी संबंधित काम करणारे आम्ही कार्यकर्ते, शिवसैनिक आहोत. जेव्हा राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं जे सरकार स्थापन झालं आणि हिंदुत्वाशी प्रतारणा झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर अनेक आमदारांना वेगवेगळे अनुभव आले आणि त्यातून हा उठाव झाला आणि शिवसेनेतून अनेक जण बाहेर पडले. उठाव झाल्यानंतर सरकार स्थापनेचा निर्णय झाला. शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारधारेशी निगडीत होऊन आम्ही शिंदे गटातील सर्व नेते शिवसैनिक काम करत आहोत. यावेळी शिवसेना आणि धनुष्यबाण आमचाच असल्याचा दावा देखील संजय राठोड यांच्याकडून करण्यात आला.

Published on: Jan 31, 2023 03:18 PM
अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषण, जयंत पाटील यांची टीका…
जयंत पाटील यांची चित्रा वाघ यांच्यावर टीका, म्हणाले…