अजित पवार यांना नियती धडा शिकवणार, 2019 चा बदला 2024 मध्ये घेणार; शिवतारे यांचं चॅलेंज काय?
बारामती लोकसभेमध्ये अपक्ष म्हणून लढणार असा इशाराच त्यांनी दिलाय. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते विजय शिवतारेंनी शरद पवार यांच्यासह अजित पवार यांना चॅलेंज देत आव्हान उभं केलंय. बारामती लोकसभा मतदारसंघात ना सुप्रिया सुळे ना सुनेत्रा पवार आता मीच उभा राहणार?
मुंबई, १२ मार्च २०२४ : शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी अजित पवार यांना आव्हान दिलं आहे. २०१९ मध्ये चॅलेंज देऊन पाडलं आता बारामतीत दोन्ही पवारांना पाडणार असा इशारच शिवतारे यांनी दिलाय. बारामती लोकसभेमध्ये अपक्ष म्हणून लढणार असा इशाराच त्यांनी दिलाय. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते विजय शिवतारेंनी शरद पवार यांच्यासह अजित पवार यांना चॅलेंज देत आव्हान उभं केलंय. बारामती लोकसभा मतदारसंघात ना सुप्रिया सुळे ना सुनेत्रा पवार आता मीच उभा राहणार अशी घोषणाच विजय शिवतारे यांनी केली आहे. पुरंदरमध्ये मदतीची स्पष्टता द्या मग बारामतीत आम्ही मदत करणार, असल्याचे शिवतारे यांनी अजित पवार यांना म्हटलं. बारामती लोकसभेत इंदापूर, पुरंदर, दौंड, भोर, खडकवासला, बारामती असे विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी अजित दादांना कुठं कुठं टेन्शन आहे? बघा स्पेशल रिपोर्ट
Published on: Mar 12, 2024 11:24 AM