Bharat Gogawale यांनी व्यक्त केली नाराजी; म्हणाले, ‘मी मंत्रीच झालो नाही तर…’
VIDEO | शिंदे सरकारकडून आज राज्यातील 11 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी अजित पवार यांना मिळाली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार भरत गोगावले
रायगड, ४ ऑक्टोबर २०२३ | राज्य सरकारकडून आज ११ जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना पुण्याच्या पालकमंत्रीपदावरुन उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यामुळे आता अजित पवार यांना पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या पालकमंत्र्यांच्या यादीवर भरत गोगावले यांनी भाष्य केले आहे. इतकेच नाही तर त्यांनी अप्रत्यक्षपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. रायगडचं पालकमंत्रीपद सध्या मंत्री उदय सामंत यांच्याकडे आहे. म्हणजे ते आमच्याकडेच आहे. अडचणीची बाब नाही. उदय सामंतांकडे पहिल्यापासूनच ते पालकमंत्री पद दिलं आहे. जोपर्यंत आमची वर्णी लागत नाही तोपर्यंत त्यांच्याकडे राहील, असं मला वाटतं, असे शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले म्हणाले. तर रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळेल का, असे विचारले असता ते म्हणाले, मी मंत्री झालो नाही. त्यामुळे पालकमंत्री कसा होणार? मंत्री झाल्यानंतरच पालकमंत्री होता येईल. तोपर्यंत रायगडचं पालकमंत्रीपद राखून ठेवलेलं असल्याचे ते म्हणाले.