मर्दाच्या हातात भगवा शोभतो, ती ताकद संजय राऊत यांच्यात आहे का? कुणी केला सवाल?
आमदार भरत गोगावले यांनी आज विठ्ठलाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला सुखी समाधानी ठेव असे साकडे घातले. मंत्रिमंडळात मंत्री म्हणून संधी मिळाली तर कष्टकरी गरीब जनता यांची सेवा करणार असल्याचे त्यांनी म्हटले असून मंत्रिमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनापूर्वी होईल असेही भाष्य केले
सोलापूर, २० नोव्हेंबर २०२३ : शिंदे गटाचे आमदार भरत शेठ गोगावले यांनी आज श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला सुखी समाधानी ठेव असे विठ्ठलाला साकडे घातले. मंत्रिमंडळात मंत्री म्हणून संधी मिळाली तर कष्टकरी गरीब जनता यांची सेवा करणार असल्याचे त्यांनी म्हटले असून मंत्रिमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनापूर्वी होईल असेही भाष्य केले. तर माध्यमांशी बोलताना भरत गोगावले यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणाही साधला. संजय राऊत यांच्या हातात भगवा झेंडा धरण्याची ताकद आहे का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केलाय. गोगावले म्हणाले, भगव्या झेंड्याची काठी मर्दाच्या हातात शोभते त्यामुळे संजय राऊतांनी आमच्या मुख्यमंत्र्यांचा नाद करायचा नाय, ज्यांनी चुका केल्या ते भोगतील ज्या पद्धतीने संजय राऊतांनी चूक केली ते जेलमध्ये जाऊन बसले, असे म्हणत गोगावले म्हणाले, आम्ही चूक केली नाही त्यामुळे तुरूंगाची भीती आम्हाला नाही.