दिसायला भोळ्या पण कपटी, बड्या नेत्याची रश्मी ठाकरेंवर टीका, …म्हणून ठाकरेंना अडीच वर्ष घरात कोंडलं

| Updated on: Apr 21, 2024 | 5:39 PM

'अतिशय विचित्र व्यक्तीमत्त्व, दिसतंय भोळं पण अतिशय कपटी. मुलाला पुढे आणण्यासाठी मातोश्रीने केलेला हा अट्टाहास. नवऱ्याला घरात कोंडून ठेवायचं आणि मुलाला पुढे आणायचं. त्यानंतर त्याला मुख्यमंत्री बनवायचं हे त्यामागचं आईचं प्लानिंग होतं.', शिंदे गटाचे नेते, आमदाराची रश्मी ठाकरेंवर टीका

शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि आमदार सदा सरवणकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. दिसतात भोळ्या, पण त्या अतिशय कपटी आहेत, अशी घणाघाती टीका सदा सरवणकर यांनी केली आहे. ते म्हणाले, मुलाला पुढे आणण्यासाठी उद्धव ठाकरेंना अडीच वर्ष घरात कोंडून ठेवलं होतं, असं वक्तव्य करत शिंदे गटाचे नेते, आमदार सदा सरवणकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंवर निशाणा साधला आहे. अतिशय विचित्र व्यक्तीमत्त्व, दिसतंय भोळं पण अतिशय कपटी. मुलाला पुढे आणण्यासाठी मातोश्रीने केलेला हा अट्टाहास. नवऱ्याला घरात कोंडून ठेवायचं आणि मुलाला पुढे आणायचं. त्यानंतर त्याला मुख्यमंत्री बनवायचं हे त्यामागचं आईचं प्लानिंग होतं. मुलाला मुख्यमंत्री बनवण्याचं आईचं प्लान होता, असं खळबळजनक वक्तव्य सदा सरवणकर यांनी केलं आहे. सदा सरवणकर यांनी केलेल्या वक्तव्यानंतर एकच चर्चांना उधान आलं आहे.

Published on: Apr 21, 2024 05:39 PM
BIG BREAKING : मुंबईच्या भाजप कार्यालयाला भीषण आग; नेमकं काय घडलं?
जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे, तोपर्यंत… संविधानाच्या मुद्द्यावरून अजितदादा विरोधकांवर भडकले