सी व्होटरचा सर्व्हे मॅनेज आणि बोगस; संजय गायकवाड यांचा दावा
'महाविकास आघाडीतील लोक दूर जाऊ नये, पक्ष सोडू नये याकरता त्यांना सांभाळण्यासाठी केलेला मॅनेज सर्व्हे'
नुकताच सी व्होटरचा सर्व्हे जाहीर करण्यात आला आहे. मात्र या सी व्होटरचा सर्व्हेने भाजप आणि शिंदे गटाची चिंता चांगलीच वाढवली आहे. कारण लोकसभेत महाविकास आघाडीला ३४ जागा तर भाजप आणि शिंदे गटाला १४ जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सी व्होटरचा सर्व्हे मॅनेज आणि बोगस आहे, असा दावा संजय गायकवाड यांनी केला असून ते म्हणाले, महाविकास आघाडी पूर्णपणे बनली नसून अद्याप चार पक्षांचं संघटन बाकी आहे. महाविकास आघाडीतील लोक दूर जाऊ नये, पक्ष सोडू नये याकरता त्यांना सांभाळण्यासाठी केलेला मॅनेज सर्व्हे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. देशात कोणता चेहरा निवडून देणार लोकं? पंतप्रधान लायकीचा चेहरा कोणत्या पक्षाकडे आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
Published on: Jan 29, 2023 08:14 AM