एकनाथ शिंदे यांच्या सभेतून लोकं उठून गेले नाही तर…, शिंदे गटाच्या नेत्याचं स्पष्टीकरण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वरळीच्या सभेवर संजय राऊत यांच्या टीकेवर संजय गायकवाड यांचं प्रत्युत्तर? काय दिले स्पष्टीकरण
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कालच्या वरळीतील सभेवर टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कालच्या सभेला कमी गर्दी झाली होती. अनेक लोक सभेतून निघून जाताना दिसले. या सभेवरून संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचल्याचे दिसून आले. यानंतर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी संजय राऊत यांच्या टीकेवर प्रत्युत्तर दिले आहे.
मुख्यमंत्र्याची सभा ज्या ठिकाणी झाली त्या वरळीतील मैदानात मोठी गर्दी होती. वरळीच्या सभेमध्ये असं झालं की पाच-सहा तासापासून लोक येऊन बसले होते. मुख्यमंत्र्यांच्या भाषणापूर्वी सहा सहा नेत्यांनी भाषण केले त्यामुळे साहेबांचे भाषण शेवटचं झालं म्हणून लोकं उठून गेली असतील, पण हे सगळ्यात नेत्यांच्या बाबतीत होते.मुख्यमंत्री येणार म्हणूनच तर हे सगळे शिवसैनिक येऊन बसले होते, त्यांनी गर्दी केली होती. मात्र सहा तास बसल्याने त्यांना अनेक नैसर्गिक समस्या असतील म्हणून ते उठून गेले असतील, असे म्हणत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी स्पष्टीकरण दिले आहे.