‘सुजित पाटकर यांच्यानंतर तुमचा नंबर, जेलमध्ये जावचं लागणार’ संजय शिरसाट यांचा रोख नेमका कुणावर?

| Updated on: Aug 11, 2023 | 5:11 PM

VIDEO | ठाकरे गटाच्या पाच खासदारांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटल्यानंतर आता ठाकरे कुटुंबातील व्यक्तीच तुरुंगात जाणार असल्याचा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला मोठा दावा

मुंबई, ११ ऑगस्ट २०२३ | शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी ठाकरे गटाच्या पाच खासदारांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. यानंतर आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे. संजय शिरसाट यांनी थेट ठाकरे कुटुंबातील व्यक्तीच तुरुंगात जाणार असल्याचं मोठं विधान केलं आहे. कोव्हिड घोटाळ्यातील संशयित आरोपी सुजीत पाटकर यांनी ईडीच्या विरोधात साक्ष दिली आहे. ईडीने जबरदस्तीने जबाब नोंदवून घेतला. मला धाक दाखवून माझा जबाब नोंदवून घेतल्याचं सुजीत पाटकर यांनी म्हटलं आहे. त्याबाबत संजय शिरसाट यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी मोठे बॉम्बच टाकले. तुम्हाला उगाच चौकशीसाठी बोलावलं का? उगाच कस्टडीत घेतलं का? मारून आरोप सिद्ध करता येत नाही. तुमच्याकडे कागदपत्र असेल गुन्ह्यात अडकला असेल तरच शिक्षा होते, असं संजय शिरसाट म्हणाले.

Published on: Aug 11, 2023 05:11 PM
मुख्यमंत्री शिंदे आणि अजितदादा यांच्यात कोल्ड वॉर?, विजय वडेट्टीवार यांनी काय केला गौप्यस्फोट?
Money Laundering Case : नवाब मलिक यांना १ वर्ष ५ महिन्यानंतर अखेर जामीन, काय आहे कारण?