शरद पवार यांनी महाराष्ट्रात गद्दारीचं बीज रोवलं, शिंदे गटातील कोणत्या नेत्यानं केला हल्लाबोल?

| Updated on: Feb 18, 2023 | 6:27 PM

VIDEO | उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा अजित पवार सत्ता गाजवत होते, शिंदे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल

बुलढाणा : महाराष्ट्रामध्ये सर्वात आधी गद्दारीचे बीज शरद पवारांनी रोवले, असे म्हणत शिंदे गटातील नेत्याने चांगलाच हल्लाबोल चढवला. राष्ट्रवादीचे नेते आम्हाला गद्दार म्हणतात मात्र महाराष्ट्रामध्ये सर्वात आधी गद्दारीचे बीज शरद पवार यांनी रोवले, अशी घणाघाती टीका बुलाढाण्यातील शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केली आहे. शरद पवार यांनी गद्दारी करत वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार केले. उद्धव ठाकरे यांच्यावर शरद पवार यांच्या विचारांचा एवढा पगडा होता की शरद पवार हे ब्रम्हदेव आहेत ते जादूची कांडी फिरून सर्व समस्यांचे निराकरण करतात अस उद्धव ठाकरे यांना वाटत होतं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, मात्र सत्ता अजित पवार गाजवत होते, अशी चौफेर फटकेबाजी प्रतापराव जाधव यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर केली आहे.