‘संजय राऊत वात्रट अन् खोटारडा माणूस’, शिंदे गटाच्या खासदाराची खोचक टीका? बघा व्हिडीओ

| Updated on: Sep 15, 2023 | 5:33 PM

VIDEO | उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यामुळे मनोज जरांगे यांनी सोडलं उपोषण, या टीकेवर शिंदे गटाच्या खासदाराचं थेट प्रत्युत्तर, बघा व्हिडीओ

बुलढाणा, १५ सप्टेंबर २०२३ | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं असल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत केली. संजय राऊत यांनी केलेल्या आरोपाचा खरपूस समाचार शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी घेतला आहे. प्रतापराव जाधव म्हणाले, ‘मी शंभरवेळा सांगितलं आहे की, संजय राऊत हा वात्रट बोलणारा आणि खोटारडा माणूस आहे, त्यामुळे त्यांच्या प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं हे बंधनकारक नाही. अमित शहा यांचे दौऱ्याचा आणि उपोषण सोडवण्याचा काहीही संबंध नाही.’ तर पुढे ते असेही म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा अत्यंत संवेदनशील माणूस आहे. गेल्या बऱ्याच दिवसापासून मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू होतं. मनोज जरांगे यांचा जीव धोक्यात येऊ नये म्हणून त्यांचं उपोषण सोडलं. मराठा आरक्षणही महत्त्वाचे आहेच. पण जरांगेही वाचले पाहिजे. म्हणून एकनाथ शिंदे हे चांगल्या भावनेतून उपोषण सोडवायला गेले होते.

Published on: Sep 15, 2023 05:33 PM
Women safety | महिलांना दिलासा, आता रिक्षानं प्रवास करणाऱ्या महिला राहणार सुरक्षित कारण…
Jayant Patil यांनी थेट सांगितली आगामी काळातील ‘मविआ’ची रणनीती? बघा नेमकं काय म्हणाले?