कचोरी ताई…आता काय करणार?; शिंदे गटाच्या ‘या’ महिला नेत्याचा किशोरी पेडणेकर यांना खोचक सवाल
kishori pednekar, sheetal mhatre, BJP, CM Eknath Shinde, Congress, Devendra Fadnavis, shivsena, uddhav thackeray, Mahavikas Aghadi
ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात एसआरएच्या सोसायटीमध्ये गाळे बळकवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पेडणेकरांच्या अडचणीत वाढ झाली असून हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. अशातच शिंदे गटही सक्रिय झाला आहे. ठाकरे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर निशाणा साधला आहे.
शीतल म्हात्रे यांनी ट्विट करून पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची बातमी पोस्ट केली. त्यावर कचोरी ताई… आता काय करणार? असा खोचक सवाल शीतल म्हात्रे यांनी केला आहे. त्यामुळे किशोरी पेडणेकर यावर काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती स्वत: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. तर वरळीच्या गोमाता जनता एसआरए सोसायटीत किशोरी पेडणेकरांनी गाळे बळकावल्याचा आरोपही किरीट सोमय्यांनी केला होता, या आरोपानंतर सोमय्यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.