‘ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यास भाजप तयार होतं पण…’, शिंदे गट शिवसनेच्या नेत्यानं काय केला मोठा दावा?
'उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांना म्हणाले मी भाजपसोबत जाणार नाही तुम्ही जा....'; संजय शिरसाट यांनी केलेल्या या मोठ्या दाव्यानंतर चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे
उद्धव ठाकरे यांना राज्याचा मुख्यमंत्री करण्यास भाजप तयार होतं, असं मोठं वक्तव्य एकनाथ शिंदे गटाते प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केले आहे. तर ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यास भाजप तयार होतं पण ठाकरेंनी फोन घेतले नाही, असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे. भाजप मुख्यमंत्रीपद देतंय आपण चर्चा करू, असं एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांनी म्हणाले होते, असंही संजय शिरसाट यांनी सांगितले पुढे त्यांनी असेही म्हटले की, उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांना म्हणाले मी भाजपसोबत जाणार नाही तुम्ही जा….दरम्यान, संजय शिरसाट यांनी केलेल्या या मोठ्या दाव्यानंतर चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. ‘2019 ला निवडणुका झाल्यात. शिवसेना आणि भाजप बहुमतात आले. त्यावेळी भाजपने दोन पावलं मागे येत उद्धव ठाकरेंना सांगितलं की अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देतो. पण त्यावेळी आम्हालाच पहिले पाहिजे असा आग्रह त्यांनी धरला. शेवटच्या क्षणाला संध्याकाळी भाजपकडून ठाकरेंना निरोप पाठवण्यात आला. बोलणी तर करा.. पण तेव्हा ठाकरे नाही म्हणाले. फोनदेखील उचलला नाही. ‘, असा मोठा दावा संजय शिरसाट यांनी केला.