‘त्याला जंगलात टाका, नदीत फेका..’, अक्षय शिंदेच्या मृतदेहाच्या दफनविधीस विरोध; ‘या’ ठिकाणी खोदलेला खड्डा बुजवला

| Updated on: Sep 29, 2024 | 3:26 PM

अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर कुटुंबियांना अक्षयच्या दफनविधीसाठी जागा मिळत नसल्याने त्यांची वणवण सुरू आहे. कळवा आणि बदलापूरमध्येही जागा मिळत नसून आरोपी अक्षय शिंदेला दफन करण्यासाठी विरोध होत आहे. दरम्यान, सोमवारपर्यंत अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करा, असे आदेश हायकोर्टाकडून देण्यात आले आहेत

Follow us on

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर गेल्या काही दिवसांपूर्वी करण्यात आला. मात्र अद्याप त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले नाहीत. अक्षय शिंदे याचा मृतदेह दफन करण्यासाठी अनेक ठिकाणी विरोध केला जात आहे. असे असताना यासंदर्भात अक्षय शिंदे याच्या पालकांनी हायकोर्टात धाव घेतली होती. याबद्दल हायकोर्टात सुनावणीही पार पडली. यावेळी हायकोर्टाने सोमवारपर्यंत अक्षय शिंदेंचा मृतदेह दफन करा असे महत्त्वपूर्ण आदेश दिले होते. या आदेशानंतरही अक्षय शिंदेच्या मृतदेहाच्या दफनविधीसाठी जागा मिळत नसल्याचे दिसत आहे. उल्हासनगरमध्ये अक्षय शिंदे याचा मृतदेह दफन करण्यास विरोध केला जात आहे. शिंदे गटाकडून अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यास विरोध होतोय. दरम्यान, अक्षय शिंदेचा मृतदेह पुरण्यासाठी खोदलेला खड्डा हा शिंदे गटाकडून बुजवण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. तर अक्षय शिंदे हा बदलापूरचा आहे. त्यामुळे त्याचे अंत्यविधी तिथेच करा, अशी स्थानिकांची मागणी आहे. ‘जिकडे अक्षय शिंदे राहतो, जिकडे त्याची हद्द आहे, तिथेच त्याला न्या.. कोणत्याही जंगलात त्याला टाका, नदीत टाका पण इथे अक्षय शिंदेचा मृतदेह इथे आणायचा नाही.’, असे म्हणत स्थानिकांनी अक्षय शिंदेच्या दफनविधीस कडाडून विरोध दर्शविल्याचे पाहायला मिळत आहे.