‘सामना’तील टीकेला संजय शिरसाट यांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, ‘स्वत: खुडूक अन् कोंबड्याही…’
VIDEO | 'अजित पवार, नाना पटोले यांनी संजय राऊत यांच्या पेकाटात लाथ मारली', संजय शिरसाट सामनात केलेल्या टीकेवर भडकले
संभाजीनगर : मिंधे गटाच्या चाळीस कोंबडय़ा महाराष्ट्रात व 13 तुर्रेबाज कोंबडे भाजपच्या खुराडय़ात बंदीवान आहेत. त्यांच्या मानेवरून कधी सुऱ्या फिरतील सांगता येत नाही. सामनातील अग्रलेखातून अशी टीका करून शिंदे गटावर टीकास्त्र डागलं आहे. या टीकेलाच शिंदे गट शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. खुराडय़ात आज दाणे घातले जात आहेत. आधी दाणा, मग कापती माना! कीर्तिकर यांनी ‘मान’ सांभाळावी, असे म्हणत सावध इशारा देखील सामना अग्रलेखातून देण्यात आला आहे. यावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले, आता दाणा टाकतील की पंचपक्वानाचं ताट देतील, याची चिंता करण्याची गरज नाही. आमच्या माना राहतील की जातील याचीही चिंता करू नये. फक्त तुम्ही मुजरे घालत आहात, त्यामुळे कंबरदुखी होईल याची काळजी घ्या, असे म्हणत खोचक टोला लगावण्यात आला आहे, मातोश्री’चं वजन घालवणारे हे लोक आम्हाला कोंबड्या म्हणताय, दुसऱ्या पक्षाच्या खुडूक कोंबड्या यांच्या पक्षात घेत आहेत. स्वत: खुडूक आणि कोंबड्याही खुडूक आहेत, असे म्हणत त्यांनी जोरदार हल्लाबोल केला.